AM 2032 Live: जागतिक ध्येये अंमलबजावणी
कृती आराखडा
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या १९३ सदस्य देशांनी २०३० पर्यंत शाश्वत विकास ध्येये गाठण्याचे निश्चित केले आहे. त्यामध्ये अर्थातच आपला भारत देश आहेच. आपल्या भारताचा वर्ल्ड एसडीजी इंडेक्स गुणानुक्रम हा १२० – १२१ इतक्या खालच्या स्तरावर आहे. आणि भारतातील राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्राचा इतर राज्यांच्या तुलनेत ९ वा क्रमांक आहे. जगात भारत आणि भारतात महाराष्ट्र २०१६ पासून ते आजतागायत ध्येये गाठण्याच्या क्रमवारीत इतका पिछाडीवर राहण्याचे कारण म्हणजे आम नागरिकांमध्ये शाश्वत विकास ध्येयाबद्दल अद्यापही नीटपणे माहिती पोहोचलेली नाही. आणि त्यामुळे सक्रीय लोकसहभागाच्या अभावामुळे क्रमवारीत आपण मागे आहोत. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊनच ‘अप्रतिम महावक्ता – २०३२ पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज – शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने’ हा आगामी ८ वर्षे सर्व घटकांना एकत्र आणून राबवायचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
विकास पत्रकारिता करणाऱ्या सर्व प्रकारच्या माध्यम संस्थांना आणि ग्रामीण – शहरी पत्रकारांना प्रोत्साहित करणे, पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या थेट व्यवसायिक अनुभव देत प्रमाणपत्र अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षित करणे आणि त्याचबरोबर जबाबदार नागरिकांना सिटीझन जर्नालिस्ट म्हणून सर्वोत्तम संधी देणे हे अप्रतिम मीडिया फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी ‘चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरिय पुरस्कार’ आणि ‘अप्रतिम महावक्ता – २०३२ पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज – शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने’ हे दोन उपक्रम विशेषत्वाने राबविले जात आहेत.
Our Mission
Make efficient communication happen among all the elements of
democracy through Content Development to Events with a journalistic approach.
Our Core values
Our resolution is to bring the best ways of achieving Sustainable Development into practice.
Our Vision
To collectively put all the elements of democracy on the path of achieving the Sustainable Development.