चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार

अप्रतिम मीडियाच्या वतीने चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कारहा उपक्रम राबवला जातो. सर्व माध्यम प्रकारातील वार्ताहर, वृत्तसंपादक, उपसंपादकसंपादक आणि विश्लेषक हे त्या त्या क्षेत्रातील चालू घडामोडी लक्षात घेतात. विशेष करून ज्यांना एखादे क्षेत्र किंवा विषय नेमून दिलेला असेल ते आपले बीट जर्नालिझमद्वारे त्या क्षेत्रातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी पुढाकार घेतातअशा विशेष पत्रकारिता बीट जर्नालिझम करणाऱ्या पत्रकारांना चौथास्तंभ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. हा पुरस्कार उपक्रम 2010 मध्ये सुरू करण्यात आला आहे. कृषी, पर्यावरणशिक्षण, आरोग्य, उद्योग-व्यापार, गुन्हेगारी वृत्त, लोकल बॉडीजराजकारण या इतर अनेक बीटमध्ये ज्यांनी ज्यांनी पत्रकार म्हणून आपले व्यावसायिक कौशल्य गुणवत्तापूर्णरित्या सिद्ध केले आहे. त्यापैकी निवडक पत्रकारांचा चौथा स्तंभ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

वर म्हटल्याप्रमाणे पर्यावरण ते राजकारण अशा विविध क्षेत्रात वृत्त संकलक व विश्लेषक म्हणून गुणवत्ता सिद्ध करणाऱ्यांना शाश्वत विकास ध्येयांची कल्पना असणे अत्यंत गरजेचे वाटते. त्यासाठीच म्हणून अप्रतिम मीडियाने अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज 2032 शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेनेया उपक्रमात पत्रकारांना समन्वयक म्हणून काम करावेअसे आवाहन केले आहे. इच्छुक पत्रकारांनी ए एम प्रेस क्लबचे सदस्य झाल्यास त्यांना या विशेष कार्यक्रम मालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे.