











AM 2032 DRIVE – SOCIAL AUDIT DRIVE
विकास सैनिक बना!
सरकारी योजनांचे ऑडीटर व्हा!
“आपल्या गावात/शहरात बदल घडवा!”
अप्रतिम मीडिया या प्रसारमाध्यम क्षेत्रातील बहुआयामी फर्मच्या माध्यमातून “AM 2032 DRIVE – Social Audit Drive” हा नागरिक-केंद्रित, संवादाधारित आणि सतत चालणारा Social Audit उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही २०१०-२०११ मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संयोजिलेल्या ‘महाराष्ट्राचा अप्रतिम महावक्ता’ या केंद्र सरकारकडे नोंदणीकृत संकल्पना कार्यक्रम मालिकेची सुधारित आवृत्ती म्हणजे ‘ए एम २०३२ ड्राईव्ह’ हा उपक्रम आहे. स्थानिक पत्रकारांच्या माध्यमातून गाव/शहर/महानगरात नागरिकांना संधी देणारा ‘ए एम २०३२ ड्राईव्ह’ हा कृती आराखडा आहे.
महाराष्ट्रात “व्हिजन-२०३०” आणि “विकसित महाराष्ट्र-२०४७” सारखे दीर्घकालीन विकास आराखडे अस्तित्वात असून विविध शासकीय योजना, निधी आणि धोरणे मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहेत. तसेच १ जानेवारी २०१६ पासून शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. शासनाचा विकासाभिमुख दृष्टिकोन निश्चितच सकारात्मक आहे; मात्र, सर्व उपक्रमांचा प्रत्यक्ष परिणाम नागरिकांच्या जीवनात कितपत आणि कसा दिसतो? पारदर्शकता, गुणवत्ता & उत्पादकता खरंच किती टक्के आहे? हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहे. ज्याची उत्तरे बहुतांश प्रमाणात नकारात्मक आहेत.
शासन नागरिक संवाद व सहभागाचे आवाहन करते; मोजक्या योजनांचे मूल्यमापनही करवू घेवू इच्छिते. हे सगळे अपुरे कसे आहे? हे मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे & सामाजिक माध्यमातून येणाऱ्या बातम्या व विश्लेषणातून दिसून येते. ते लक्षात घेवूनच आम्ही लोकांना त्यांच्या परिसरात – पंचक्रोशीत जे प्रश्न व समस्या भेडसावतात, त्याविषयीची योजना, कामे सार्वजनिकरित्या तपासता यावीत; यासाठी २०३२ पर्यत अखंडितपणे चालणारा अशासकीय सामाजिक अंकेक्षणाचा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे, तो म्हणजे – ‘ए एम २०३२ ड्राईव्ह’.
‘ए एम २०३२ ड्राईव्ह’ ही संकल्पना पुढील चार स्तंभांवर आधारित आहे:
- राजकीय इच्छाशक्ती
- प्रशासन
- नागरिक सहभाग
सामाजिक अंकेक्षण
या “Development Quadrangle” च्या एकत्रित सहभागाशिवाय खऱ्या अर्थाने विकास साध्य होऊ शकत नाही, असा आमचा ठाम विश्वास आहे.
आजची वस्तुस्थिती:
- शासन सांख्यिकी अहवाल तयार होतात, पण लोकांपर्यंत समजत नाहीत.
- आकडेवारी संयुक्त राष्ट्र संघटनापर्यंत पोहोचते, पण गावात समजली जात नाही!
- योजना आहेत, पण तितका समाधानकारक परिणाम अल्पच ठरतो
- युएन एसडीजी एजेंडा २०३० आहे, २०१६ पासून एसडीजी स्कोर निराशाजनक आहे.
- महाराष्ट्र शासनाने आधी ‘व्हिजन-२०३०’ आणि आता ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ नियोजन आराखडा, नागरिकांची मते यासह नेमकेपणाने स्थानिक पातळीवर अपेक्षित संवाद होताना दिसत नाही.
- शासन आपल्या दारी पासून अनेक प्रकारचे अभियान राबविले जात असतात; तरी वंचितांचे प्रमाण तपासले जातेच असे नाही.
- प्रसार माध्यमांमध्ये स्थानिक समस्यांच्या बातम्यांचा सदैव भडीमार असतो.
- शासनाचे माहिती व जनसंपर्क खाते वा सीएमओ कार्यालय कितपत नोंद घेते; संबधित बातमीची शहानिशा व आवश्यक कारवाई काय होते? यासंबंधी वार्ताहरांशी संपर्क साधला जात नाही.
- एसडीजी फ्रेमबद्दल जागरूक असणारे आजी-माजी (किंवा भावी!) लोकप्रतिनिधी क्वचितच आढळतात.
- विविध घटकातील सुशिक्षित, अर्धशिक्षित, निरक्षर अशा तिन्ही प्रकारातील बहुतांश नागरिकांमध्ये मुळात विकास साक्षरतेचे प्रमाण नगण्य आहे.
- ग्रामपंचायत ते विधीमंडळ कामकाजातील विकास चर्चा आणि त्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी किती? यासह अनेक संशोधनाचे विषय आहेत.
उपक्रमाची गरज (Why AM 2032 Drive?)
आजची वस्तुस्थिती (Ground Reality Check)
आज महाराष्ट्रात विकासासाठी व्हिजन-२०३० आणि विकसित महाराष्ट्र-२०४७ हे नियोजन आराखडे आणि प्रत्येक जिल्ह्याचेही अर्थातच व्हिजन डॉक्युमेंट गेल्या कित्येक वर्षांपासून तयार आहेत. शासनाचा हा विकास विचार चांगला आहे. प्रश्न कृतीचा आहे. नियोजन विभागात आणि सार्वजनिक दृष्ट्या आराखडे आहेत. मोठ्या प्रमाणावर योजना, निधी आणि धोरणे अस्तित्वात आहेत. आराखडे आणि प्रत्यक्षातील आकडे १००% ताळमेळ घालणे केवळ अशक्य आहे, असे म्हणत मागील पानावरून पुढे चालू हे परवडणारे नाही.
अर्थ अभ्यासकांचीही वेगवेगळी मते असतातच. धोरण, अंमलबजावणी आणि दोन्हीपासून नागरिक हा कोसो दूर असतो. तेव्हा, विकास साक्षरतेची चळवळ आणि त्यापाठोपाठ लोकांकडून मूल्यमापन अत्यावश्यक बनते. सरकार आपल्यापरीने प्रयत्न करते. नागरिकांनी विकस प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करते. नगण्य प्रमाणात का होईना, प्रतिसाद मिळतोही. पण, शेवटी शासकीय यंत्रणेतील चुका & गैरव्यवहार थांबत नाही. तेव्हा, लाभार्थी किंवा वंचित राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्याशी संबंधीत स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजेत. ते सरकारविरुद्ध रान पेटविण्यासाठी नव्हे तर संवाद & सुधारणेसाठी. त्यासाठी विसंवाद, अपुरा निधी, निधीचा गैरवापर, वेळेचा अपव्यव, भ्रष्टाचार यावर साधार खुली चर्चा आवश्यक.
सरकार & विरोधकांचा केवळ बोलघेवडेपणा उपयोगाचा नाही. खऱ्या अर्थाने, गावात, शहरात, महानगरात फक्त नागरिक केंद्रस्थानी ठेवून पारदर्शकता, गुणवत्ता & उत्पादकता प्रत्येक छोट्या-मोठ्या कामाबाबतीत साध्य करायची असेल, विकास म्हणजे काय? हे किमान वा कमाल पातळीवर समजणाऱ्या राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण क्षेत्रातील महिला – पुरुष, अनुभवी व युवा नेते, कार्यकर्ते, अभ्यासक, पत्रकार इत्यादी एकत्र आले पाहिजेत.
जिल्हा प्रशासन दरवर्षी सामाजिक-आर्थिक समालोचन अहवालात आकडेवारी जाहीर करते; त्याची पडताळणी केली पाहिजेत. जिल्हा नियोजन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, आजी-माजी ( आणि भावी सुद्धा!) लोकप्रतिनिधी, समस्या मांडणारे विकास कार्यकर्ते यांच्याशी अगदी छोट्या गटांनी निदान त्यांच्याशी संबंधीत कामाबद्दल विचारले पाहिजेत.
जिल्हा प्रशासनाचे व्हिजन डॉक्युमेंट असेल ते समजावून घेतले पाहिजेत. आणि सर्वात अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अतिशय सुक्ष्म व नेमकेपणाने वृत्तांकन व विश्लेषण करणाऱ्या वार्ताहरांनी दिलेल्या बातम्या, स्पेशल स्टोरीज, वृत्तमालिकेतून जे प्रश्न मांडले आहेत; त्याचा आधार घेत संबधित कामाचे, योजनेचे सोशल ऑडीट केले पाहिजेत.
परंपरागत जे शासकीय सोशल ऑडीट होत असते, त्याच्या जोडीला अशासकीय सोशल ऑडीट गरजेचे आहे. अर्थातच, ते घटनेने दिलेल्या चौकटीत बसणारे. थोडक्यात, राष्ट्रीय, राज्य पातळीपेक्षा सर्व घटकांनी एकत्र येवून आपल्या अवती-भवतीच्या विकास कामांचा तपशील समजावून घेतला पाहिजेत.
परंपरागत जे शासकीय सोशल ऑडीट होत असते, त्याच्या जोडीला अशासकीय सोशल ऑडीट गरजेचे आहे. उदाहरणार्थ, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना यासह शिक्षण, आरोग्यातील काही योजनांचे सोशल ऑडिट सरकार करते. नागरिकांनाही सहभागी होण्याचे आवाहन करते. घटनेच्या 73 व 74 व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामसभा वार्ड सभा होतात. हे मान्य केले तरी शासन करत असलेल्या सोशल ऑडिटच्या कामांबद्दल चे गैरव्यवहार हे प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतातच आणि सर्वत्रच ग्रामसभा व वाढ सभा होऊन निकोप चर्चा होतेच असे नाही मुळातच या स्वभाव होतात का हे देखील प्रमाण कमी आहे. म्हणून घटनेने दिलेल्या चौकटीत बसणारे अशासकीय सोशल ऑडिट होत राहणे, अत्यावश्यक आहे.
आपल्या ठिकाणी जे जे खटकते, त्यावर कमी कालावधीत कमी संख्येने का होईना संबंधित नागरिकांनी एकत्र येऊन शहानिशा केलीच पाहिजेत. थोडक्यात, राष्ट्रीय, राज्य पातळीपेक्षा सर्व घटकांनी एकत्र येवून आपल्या अवती-भवतीच्या विकास कामांचा तपशील समजावून घेतला पाहिजेत. आता अतिशय संक्षिप्तपणे वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच, ए एम 2032 ड्राईव्ह ही संकल्पना तयार झाली. त्याच्यासंबंधी स्वतंत्र ठिकाणी माहिती दिली आहे ती अवश्य वाचावी. सूचनांचे अर्थातच स्वागत आहे. या संकल्पनेनुसार ज्यांना काम करावयाचे आहे, त्यांना सहज सुलभ पणे एकत्र येता येईल, यासाठी नऊ प्रकारचे अप्रतिम विकास मंच स्थापन करावेत. त्याचे सदस्यत्व घेण्यासाठी www. apratimmedia.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी.
९ फोरम – संरचित कृती व्यासपीठ
AM 2032 DRIVE अंतर्गत पुढील ९ विकास मंच (Forums) कार्यरत राहतील:
९ विकास मंच (Forums) – या उपक्रमासाठी स्थानिक पातळीवर पुढील ९ मंच स्थापन केले जातील:
- AM Press & Media Forum – प्रेस व मीडिया फोरम
- AM Political & Governance Forum – राजकीय व प्रशासन फोरम
- AM Education & Youth Forum – शिक्षण व युवा फोरम
- AM Public Health Forum – सार्वजनिक आरोग्य फोरम
- Women Empowerment Forum – महिला सक्षमीकरण फोरम
- AM Agriculture & Environment Forum – कृषी व पर्यावरण फोरम
- AM Expert, Lawyer & Senior Citizen Forum – तज्ज्ञ, वकील व ज्येष्ठ नागरिक फोरम
- AM Corporate & Industrial Forum – कॉर्पोरेट व औद्योगिक फोरम
- AM SDG Master Trainer
प्रत्येक फोरम हा “Field Audit Unit” म्हणून काम करेल
Citizen-driven, Continuous & Dialogue-based Social Audit System”
AM 2032 DRIVE ही संकल्पना पुढील गोष्टी साध्य करण्यासाठी तयार केली आहे:
नागरिकांना “विकास सैनिक” म्हणून सक्षम करणे
सरकारी योजनांचे अशासकीय पण संरचित Social Audit
Data → Dialogue → Decision → Development हा चक्र पूर्ण करणे
शासनाला Evidence-based Feedback System उपलब्ध करून देणे
SDGs चे खऱ्या अर्थाने Localization
पार्श्वभूमी
अप्रतिम मीडिया ही प्रसार माध्यम क्षेत्राशी निगडित बहुआयामी खाजगी संस्था असून विकास विषयक जनजागृती, नागरिक-शासन संवाद आणि शाश्वत विकास ध्येय (SDGs) याविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त (२०१०–२०११) अप्रतिम मीडियाने मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स (MDGs) डोळ्यासमोर ठेवून ३० विकास विषयांवर नागरिकांच्या प्रतिक्रिया संकलित करण्याचा अभिनव उपक्रम राबविला होता. याअंतर्गत मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर येथे “अप्रतिम महावक्ता” या खुल्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख यांनी घेतली होती.
यानंतर अप्रतिम मीडियाने शाश्वत विकास ध्येय (SDGs) डोळ्यासमोर ठेवून विविध संवाद, जनजागृती आणि विकास विषयक उपक्रम राबविले आहेत. अलीकडेच मा. उपमुख्यमंत्री श्री.
एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते शाश्वत विकास विषयक उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान तसेच “ए एम २०३२ ड्राईव्ह – सोशल ऑडीट ड्राईव्ह” या उपक्रमाच्या लोगोचे प्रकाशन करण्यात आले आहे. ही संकल्पना पत्रकार डॉ.अनिल फळे यांची असून ती केंद्र सरकारच्या कॉपीराईट कायदा 1956 नुसार अधिकृतपणे तसेच फिल्म रायटर्स असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई यांच्याकडे रीतसरपणे नोंदवण्यात आलेली आहे. सर्वाधिकार राखून आहेत.
तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत “पहिली महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषद” मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.
