चला, विकास सैनिक बनू या!
समस्या हटवू या! परिसर समुद्ध बनवू या!

‘श्वास महाराष्ट्राचा’ मोहिमेत कर्तृत्व गाजवा!

ए एम २०३२ लाईव्ह: एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर माहितीपत्रक

‘एएम २०३२ लाईव्ह’ (AM 2032 LIVE) अर्थात अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज-२०३२ शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने (APRATIM MAHAVKTA – PUBLIC TALENT REALITY SHOW SERIES 2032 TOWARDS SDG) या ‘अप्रतिम मीडिया’ संयोजित प्रसारमाध्यम क्षेत्रातील विक्रमी उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून ‘श्वास महाराष्ट्राचा’ ही जनजागृती मोहीम राबविली जात आहे.

‘श्वास महाराष्ट्राचा’ या मोहिमेचा  मुख्य उद्देश जागतिक ध्येये – शाश्वत विकास ध्येय (SDGs) यांचे स्थानिकीकरण (Localization) प्रभावीपणे साधणे. विशेषतः शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून नागरिक सजगता, सहभाग आणि कृतीशील नेतृत्व निर्माण करणे हा केंद्रबिंदू आहे.

संयुक्त राष्ट्र संघटना, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020), राष्ट्रीय शैक्षणिक मूल्यांकन व प्रशिक्षण संस्था (NCERT / SCERT), तसेच महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण विभाग यांच्याकडून शिफारस केलेल्या धोरणात्मक मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने, शिक्षण संस्था हे SDG स्थानिकीकरणाचे प्रभावी केंद्र म्हणून कार्य करू शकतात, यावर आमचा ठाम विश्वास आहे.

एक ते 17 शाश्वत विकास ध्येय लक्षात घेऊन त्यापैकी गुणवत्ता पूर्ण शिक्षण 4 , शाश्वत शहरे 11 आणि विकासात्मक भागीदारी 17 हे डोळ्यासमोर ठेवून उदाहरणार्थ छत्रपती संभाजी नगर या महानगरामध्ये श्वास महाराष्ट्राचा या मोहीम राबविली जाईल. याप्रमाणे इतर महानगरांमध्येही व जिल्हा शहरांमध्ये  कार्यक्रम होतील. तसेच ग्रामीण भागात श्वास महाराष्ट्राचा हा स्वतंत्र स्वरूपाचा कार्यक्रम राबविला जाईल.  

छत्रपती संभाजी नगर शहर आणि जिल्ह्याने आजवर शाश्वत विकास ध्येय अर्थात गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाश्वत शहरे & सर्वसमावेशक भागीदारी या ध्येयांसाठी कशाप्रकारे योजनांची अंमलबजावणी केलेली आहे? ती अधिक परिणामकारकपणे करण्यासाठी लोकांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. वर्तमान काळातील गरज लक्षात घेऊन भविष्याचा वेध घेणाऱ्या युवक युवतींच्या माध्यमातून श्वास महाराष्ट्राचा या मोहिमेला छत्रपती संभाजी नगर मध्ये प्रारंभ करावयाचा आहे.

ए एम २०३२ लाईव्हअंतर्गत श्वास महाराष्ट्राचा ही मोहीम आखण्यात आली आहे. ज्यामध्ये पत्रकारांच्या पुढाकाराने माहिती-मनोरंजनपर विविध कार्यक्रम, स्पर्धा, प्रसारण, प्रकाशन इत्यादी गोष्टी साकारल्या जाणार आहेत.

इच्छुकांनी प्रथमत: एएम फोरमचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. ए एम २०३२ लाईव्हअंतर्गत श्वास महाराष्ट्राचा मोहिमेचे सदस्यत्व घेणाऱ्या प्रत्येक व्यक्ती – संस्थेला ‘प्रमाणपत्र’ देण्यात येईल.

www.apartimmedia.in या संकेतस्थळावर आपल्याला अनुरूप ए एम फोरममध्ये सशुल्क नोंदणी करावी. (जसे, राजकीय कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांनी एएम पॉलिटिकल फोरम; सामाजिक व शासकीय निमशासकीय संस्थांनी ए एम जिओ एनजिओ फोरम; शैक्षणिक संस्थांनी ए एम एज्युकेशनल फोरम; तज्ञ अभ्यासकांनी ए एम एक्सपर्ट फोरम; अध्यात्मिक व्यक्ती संस्थांनी ए एम स्पिरीच्युअल फोरम;  व्यापारी उद्योग कंपन्यांनी ए एम कार्पोरेट फोरम)

त्या त्या परिसरातील सर्व संबंधित घटकांना प्रेस फोरम सदस्य  पत्रकारांच्या माध्यमातून एकत्र करून उपक्रम राबविले जाणार आहेत. 

आपल्या महानगरात शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण व अंमलबजावणीसाठी संबंधित शासकीय योजना, सामाजिक उपक्रम, कार्पोरेट सामाजिक जबाबदारी इत्यादी सर्व गोष्टींचा आढावा घेणे, ध्येयपूर्तीसाठी आपले योगदान देण्यासाठी सर्व घटकांचा एकत्रित पुढाकार महत्वाचा आहे.

शाश्वत विकास ध्येयांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक पातळीवर राजकीय इच्छाशक्ती पाहिजेत, स्थानिक प्रशासनामध्ये पारदर्शकता उत्पादकता व गुणवत्ता पाहिजेत आणि त्यासाठी नागरिकांचा व्यक्तिश: व संस्थात्मक सक्रिय सहभाग महत्वचा आहे. केंद्र-राज्य सरकारच्या संबंधीत योजनांमध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. त्या दृष्टीने त्या त्या परिसरात लोकचळवळीशिवाय विकास प्रक्रिया गतिमान होऊ शकत नाही, त्यासाठी ‘ए एम २०३२ लाईव्ह’अंतर्गत ‘श्वास महाराष्ट्राचा’ हा सर्वार्थाने लोकाभिमुख उपक्रम आहे. शुभारंभ म्हणून ठिकठिकाणी एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.