AM Press Club

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि न्यू मीडिया या तीनही प्रकारातील संस्था आणि पत्रकारांना दर्जेदार आशय निर्मिती व व्यवस्थापन; सामाजिक समन्वयाची जबाबदारी आणि व्यावसायिक लाभ देण्यासाठी ‘एएम प्रेस फोरम’ (AM PRESS FORUM)मध्ये सदस्य होण्याचे आवाहन करत आहे.

विकास पत्रकारिता करणाऱ्या सर्व प्रकारच्या  माध्यम संस्थांना आणि ग्रामीण – शहरी पत्रकारांना प्रोत्साहित करणे, पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या थेट व्यवसायिक अनुभव देत प्रमाणपत्र अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षित करणे आणि त्याचबरोबर जबाबदार नागरिकांना सिटीझन जर्नालिस्ट म्हणून सर्वोत्तम संधी देणे हे अप्रतिम मीडिया फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी ‘चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरिय पुरस्कार’ आणि ‘अप्रतिम महावक्ता – २०३२  पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज – शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने’ हे दोन उपक्रम विशेषत्वाने राबविले जात आहेत. ही कार्यक्रम मालिका म्हणजे केवळ वक्तृत्व स्पर्धा नसून विविध उपक्रमांचे व्यासपीठ आहे. 

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व न्यू मीडियातील सर्व व्यवस्थापन व स्थानिक वार्ताहरांसाठी अप्रतिम मीडिया फाउंडेशनच्या वतीने ‘एएम प्रेस फोरम’ची स्थापना करण्यात आली आहे. “अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज – शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने” हा एक कृती आराखडा आहे. जो महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा, विभाग आणि अर्थातच राज्यात राबविला जाणार आहे. जागतिक ध्येये म्हणजे शास्वत विकास ध्येये यांचे स्थानिकीकरण करणे, यासाठी पत्रकार संस्था व व्यक्तिशः पत्रकारांनी समन्वयकाची भूमिका बजवावी, अशी अपेक्षा आहे. 

आगामी सार्वत्रिक निवडणुका लोकसभा व विधानसभा या काळामध्ये जनजागृती करण्यासाठी या फोरमचे सदस्य होणाऱ्या पत्रकारांच्या व माध्यम संस्थांच्या मार्फत अनेक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. ‘अप्रतिम मीडिया’ ही बहु आयामी एजन्सी असल्याने सर्व माध्यम संस्थांना व मुक्त पत्रकारांना ‘ए एम प्रेस फोरम’चे सदस्य होता येईल. दैनिकांच्या विशेष पुरवण्या, वृत्तवाहिन्यांचे स्पेशल फीचर्स, वेब पोर्टल व युट्युब चॅनेल साठी वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट इत्यादी अनेक साधने एका छत्राखाली आणली जात आहेत. यासाठी पत्रकारांचे ‘अप्रतिम महावक्ता’चे कार्यानुरूप वृत्तांकन – विश्लेषण आणि माध्यम व्यवसायिकांसाठी मोठा व्यवसाय अशी दुहेरी संधी ‘एएम प्रेस फोरम’च्या सदस्यांना मिळणार आहे. 

निवड झालेल्यांना प्रशिक्षण व प्रेस ओळखपत्र देण्यात येईल. 

आपली सदस्य नोंदणी आजच करा. पुढील लिंक वर क्लिक करा.

AM Press Forum

आपणास ओळखणाऱ्या दोन प्रतिष्ठीत व्यक्तींची नांवे व मोबाईल क्रमांक