AM Political Forum

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या निमित्ताने पत्रकारांच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या खास मोहिमेत राजकीय पक्ष, नेते, उमेदवार, कार्यकर्त्यांना सहभागी होण्याची सुवर्णसंधी

निवडणूकांमध्ये अप्रतिम मीडियाच्या वतीने सर्व प्रकारच्या स्थानिक पत्रकारांच्या पुढाकारातून अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. शाश्वत विकास ध्येयाच्या जनजागृती साठी हे कार्यक्रम होत आहेत, या कार्यक्रमामध्ये AM POLITICAL FORUM चे सदस्य होणाऱ्या राजकीय पक्ष, नेते, उमेदवार, कार्यकर्त्यांना सहभागी होता येईल.

विकासाच्या एकूणच सर्व प्रक्रियेमध्ये राजकीय क्षेत्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने त्या त्या घटकाच्या समस्या सोडवण्यासाठी विविध संघटना नेमलेल्या असतात. जसे महिला, युवक युवती, शिक्षक, एसटी, कर्मचारी, शेतकरी व अन्य इतर अनेक प्रकारच्या. या सर्व संघटनांना व त्यांच्या सदस्यांना या ‘एएम पॉलिटिकल फोरम’चे सदस्य होता येईल.

आपापल्या कार्यक्षेत्रात शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण व त्याचे महत्त्व सांगणारे प्रशिक्षण अप्रतिम मीडियाच्या मार्फत देण्यात येईल. त्यानंतर ‘अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज २०३२ – शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने‘ या पत्रकारांच्या पुढाकारातून राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रम मालिकेमध्ये सदस्य झालेल्या राजकीय कार्यकर्ते नेते व संघटनांना विविध कार्यक्रम आयोजित करता येतील. ज्याची एक शिस्तबद्ध चौकट अप्रतिम मीडियाने तयार केलेली आहे.

थोडक्यात राजकीय क्षेत्राकडून राजकारण वजा जाता जे सामाजिक व सर्वसमावेशक विकास यासंबंधी जे काम केले जाते, त्या कामाची दखल घेऊन हा त्या अर्थाने निष्पक्ष ‘ए एम पॉलिटिकल फोरम‘ स्थापन करण्यात येत आहे. आपापली विचारसरणी व पक्षाचे धोरण बाजूला ठेवून सदस्यांनी केवळ शाश्वत विकास ध्येयाचे महत्त्व लक्षात घेऊन पत्रकारांच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे.

सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील लिंक वर क्लिक करून आपले रजिस्ट्रेशन करावे. वैयक्तिक पातळीवर कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी रजिस्ट्रेशन करू शकतात तसेच त्या त्या राजकीय पक्षांच्या विविध संघटना देखील सदस्यत्व घेऊ शकतात. प्रत्येकास ‘ए एम पॉलिटिकल फोरम’चे सदस्यत्व प्रमाणपत्र व बॅच देण्यात येईल.

AM Political Club