AM GO-NGO Forum

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या निमित्ताने पत्रकारांच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या खास मोहिमेत सामाजिक संस्था – एनजीओ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक, युवा, महिला संघटनांना सहभागी होण्याची सुवर्णसंधी

निवडणूकांमध्ये अप्रतिम मीडियाच्या वतीने सर्व प्रकारच्या स्थानिक पत्रकारांच्या पुढाकारातून अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. शाश्वत विकास ध्येयाच्या जनजागृती साठी हे कार्यक्रम होत आहेत, या कार्यक्रमामध्ये AM GO-NGO FORUM चे सदस्य होणाऱ्या सामाजिक संस्थांना सहभागी होता येईल. गाव, तालुका, जिल्हा पातळीवर गरिबी हटविण्यापासून ते रोजगार निर्मिती तसेच शाश्वत गाव / शहर करण्यापासून ते जागतिक हवामानापर्यंतचे अनेक विषय लक्षात घेऊन प्रत्येक मतदारसंघात खुलेआम बिनधास्त चर्चा, लोकसंवाद म्हणजे

“अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज – शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने”

गाव, तालुका, जिल्हा, प्रांत किंवा विभागीय आणि राज्य पातळीवर संस्थांचे त्यांच्या उद्दिष्टांनुसार शिक्षण, आरोग्य, कृषी, युवा वर्ग, महिला वा अन्य कोणत्याही विशिष्ट कार्याची दखल घेवून अप्रतिम मिडीया विविध कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, सामाजिक संशोधन या व इतर गोष्टींसाठी संधी देणार आहे. त्यासाठी इच्छुक संस्थांनी या  AM GO-NGO FORUM चे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे.

 शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण करतांना राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा व तालुका प्रशासन आणि त्याचबरोबर अशासकीय संस्थांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक संस्थांना विशेष उल्लेखनीय कार्य लक्षात घेवून देण्यासाठी ‘अप्रतिम गौरव’ हा पुरस्कार देवून प्रोत्साहन दिले जाते. 

गेल्या ३० नोव्हेंबर, २०२३ रोजी मुंबई येथे अप्रतिम मीडिया आयोजित संपन्न झालेल्या ‘पहिल्या शाश्वत विकास ध्येय परिषदेत’ महाराष्ट्र शासनाचा नियोजन विभाग, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष यासंह राज्यातील अनेक सामाजिक संस्थांना  ‘अप्रतिम गौरव’ने सन्मानित करण्यात आलेले आहे. आगामी काळात विभागीय, जिल्हा आणि तालुका पातळीवर हा पुरस्कार उपक्रम चालू राहणार आहे. 

‘अप्रतिम महावक्ता’ची संकल्पना व त्या अनुषगांने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये शासनाचे विविध विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा व तालुका प्रशासन आणि अशासकीय सामाजिक संस्था, नागरिक संघटना  सहभागी होऊ शकतात. 

गरिबी निर्मूलनापासून ते जागतिक भागीदारीपर्यंतच्या या ना त्या ध्येयांसाठी संस्थेने केलेल्या कार्याची दखल शासकीय यंत्रणा कडे चांगल्याप्रकारे पोहोचली जाईल. शासनाच्या संबंधीत खात्यांचा http://apratimmedia.in/apratim-mahavkta/ या एकूण उपक्रमात सहभाग आहे. 

शासकीय व खाजगी क्षेत्राकडून आर्थिकदृष्ट्या सहकार्य मिळविण्यासाठी संस्थेची वाट अधिक सुकर होऊ शकते. त्याचबरोबर राज्य सरकारच्या विविध खात्यांना योजनांचा अंमलबजावणी आढावा घेणे, स्थानिक प्रशासनाला सार्वजनिक हिताच्या योजना राबविताना सक्रीय लोक सहभाग मिळविणे इत्यादीसाठी अधिक सहाय्यभूत असे कार्यक्रम होत आहेत.

शासकीय विभाग आणि स्थानिक प्रशासनच्या कामांमध्ये, अशासकीय संस्थेच्या कार्यामध्ये अधिक प्रमाणात गुणवत्ता आणि सामाजिकदृष्ट्या उत्पादकता दिसून येईल, अशाप्रकारे महत्वपूर्ण ठरतील, असे उपक्रम-कार्यक्रम या फोरमद्वारे राबविले जाणार आहेत. त्यासाठी सदस्यत्व घेतलेल्या शासकीय व अशासकीय संस्थांना, सामाजिक संघटनांना “प्रमाणपत्र” दिले जाते. संस्थांनी येथे आपली नोंदणी करावी.

AM GO-NGO Club