वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करत भविष्यकालीन विचार करून, केला जाणारा विकास म्हणजे शाश्वत विकास. नव्या पिढीचे वर्तमान व भविष्य लक्षात घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये शाश्वत विकास ध्येयाच्या दृष्टीने वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण प्रशिक्षण दिले जाते. अगदी प्राथमिक शाळेपासून ते उच्च शिक्षणाच्या विद्यापीठापर्यंत अनेक मौलिक पद्धतीने शिक्षण दिले जाते. विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक किंवा अधिकारी मंडळ कोणतेही असो त्यांच्या जाणीवेचा व ज्ञानाचा उपयोग नागरिक व जबाबदार सार्वजनिक संस्था म्हणून एकूणच समाजाला उपयोग होत असतो. हे लक्षात घेऊन पत्रकारांच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या ‘अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज २०३२ शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने‘ या उपक्रमात शिक्षण क्षेत्रातील सर्वांचा सक्रिय सहभाग असणे, अत्यंत गरजेचे वाटते; म्हणूनच हा ‘ए एम एज्युकेशन फोरम‘ स्थापन करण्यात येत आहे. संबंधित विद्यार्थी संघटना संस्थांनी याचे सदस्यत्व घ्यावे जेणेकरून शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी जो सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे त्याला अधिक बळकटी येईल. अप्रतिम महावक्ता हा एक त्या दृष्टीने थेट कृती आराखडा आहे. सदस्य होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाईल.