AM Corporate Forum
शाश्वत विकासामध्ये खाजगी क्षेत्राचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना तसेच अशासकीय संस्थांचा विविध मूलभूत समस्यांविषयीचा सहभाग लक्षात घेता खाजगी क्षेत्रातून आर्थिक रूपाने उत्तेजन मिळणे, ही काळाची गरज आहे. त्यानुसार कार्पोरेट सीएसआर फंडातून शिक्षण, आरोग्य, स्वच्छता निर्मूलन, पर्यावरण, पाणी, राष्ट्रीय आपत्ती या व इतर अनेक कारणांसाठी आर्थिक पुरवठा करत असते. ‘अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज २०३२’ ही आगामी १० वर्षे चालणारी कार्यक्रम मालिका ‘शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने’ असणार आहे. यासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व नव माध्यमातील पत्रकारांनी समन्वयक म्हणून पुढाकार घेतलेला आहे. आत्तापर्यंत अप्रतिम मीडिया फाउंडेशनच्या या नीती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी झालेल्या आणि ८०जी प्रमाणपत्र प्राप्त संस्थेने राज्य शासन व सामाजिक संस्था, पत्रकार संघटना, नागरिक संघटना यांना सोबत घेऊन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. एकूणच, सर्व घटकांना एकत्र करून शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी जनजागृती व लोकसंवादात्मक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ज्यामुळे शाश्वत विकास ध्येय म्हणजे जागतिक ध्येयांचे स्थानिकीकरण करण्यासाठी मोठे प्रोत्साहन मिळत आहे हे लक्षात घेऊन कार्पोरेट कंपन्यांनी आपला सीएसआर निधी या उपक्रमासाठी द्यावा. त्या त्या खाजगी कंपन्यांनी आजवर ज्या ज्या संस्थांना त्यांच्या शाश्वत व सामाजिक कार्यासाठी जो निधी दिला आहे. त्या सर्व लाभार्थी संस्थांना सामावून घेणारा ‘अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज २०३२ – शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने’ हा एक कृती आराखडा आहे; हे लक्षात घ्यावे. अप्रतिम मीडिया फौंडेशन ही प्रसारमाध्यम क्षेत्रातील अशी एकमेव बहुआयामी संस्था आहे. या एसडीजी जर्नालिझमला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेच्या वैशिष्ट्यपूर्ण इव्हेंट सिरीजमध्ये शासनासह सर्व घटकांचा समावेश आहे. हे लक्षात घेवून कार्पोरेट जगताकडून आर्थिक सहकार्य अत्यावश्यक आहे.
त्याचप्रमाणे ज्यांना आपल्या सामाजिक दायित्वाबरोबरच आपल्या व्यवसायावृद्धीच्या योजना राबवायच्या असतील तर त्यासाठी देखील मोठी सुवर्णसंधी या कृती आराखड्याच्या माध्यमातून मिळणार आहे. जसे ब्रॅण्डिंग, इमेज मेकिंग, प्रॉडक्ट प्रमोशन इत्यादी सर्व गोष्टी व्यावसायिक दृष्ट्या साध्य होतील. ग्रामीण पातळीपासून ते महानगरांपर्यंत विविध कार्यक्रम व उपक्रमाद्वारे हे सहजशक्य होणार आहे. कार्पोरेट कंपन्यांनी ‘अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज २०३२ – शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने’ या उपक्रमासाठी केलेली गुंतवणूक ही त्यांना मोठ्या प्रमाणात आर ओ आय (ROI) आणि त्याचबरोबर एस आर आय (SRI) या दोन्ही गोष्टी मिळवून देणार आहे. प्रायोजकत्वाच्या देखील स्वतंत्र सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
इच्छुक सर्व कार्पोरेट कंपन्यांनी अप्रतिम मीडियाने खास करून स्थापन केलेल्या या ‘ए एम कार्पोरेट क्लब’ चे सदस्यत्व घ्यावे; त्यासाठी आपली नोंदणी पुढील लिंक वर करावी.