मास्टर ट्रेनर समन्वयक पदासाठी अर्ज
‘अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज २०३२’ हा ‘शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने’ आगामी किमान ८ वर्षे राबविला जाणारा एक कृती आराखडा आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने निर्धारित केलेल्या गरिबी निर्मूलन ते वैश्विक भागीदारी पर्यतच्या जागतिक ध्येयांचे स्थानिकीकरण करणे, हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सक्रीय लोकसहभाग असल्याशिवाय स्थानिक पातळीवर शाश्वत विकास ध्येये गाठणे ही अशक्य बाब आहे. त्यासाठी ‘अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज २०३२’ च्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ३५८ तालुके व ४२,०००च्या वर खेडी, तसेच लहान-मोठी शहरे व महानगरांमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यासाठी एसडीजी, ग्राम विकास, शहरी विकास व अन्य अनुशंगिक गोष्टींबाबत प्रशिक्षण घेतलेले नागरिक व प्रशिक्षक यांना स्थानिक समन्वयक नेमले जात आहेत. त्यासाठी मी येथे अर्ज करत आहे.
आगामी ८ वर्षे चालणाऱ्या या ‘अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज २०३२’ मालिकेसंबंधी मुंबई येथे समन्वयक म्हणून निवडीसाठी माझी मुलाखत तसेच सर्व अर्जदार मास्टर ट्रेनर व इतरांसाठी माहितीपर कार्यक्रम तथा निवडपूर्ण प्रशिक्षण होणार आहे. त्यासाठी मी स्वखर्चाने येण्यास तयार आहे. मला संयोजक संस्थेचे सर्व नियम मान्य आहेत. कृपया येथे मी येथे खालीलप्रमाणे माझा अर्ज करत आहे.