About Us
अप्रतिम मीडिया फाउंडेशनने २०१०-२०११ साली राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘अप्रतिम महावक्ता’ ही नागरिकांसाठी खुली स्पर्धा घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनाही संकल्पना अतिशय आवडली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या सहा महसूल विभागांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विविध जिल्ह्यातील लोकांचा प्रातनिधिक स्वरूपात सहभाग होता. त्यावेळी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स (Millennium Development Goals) डोळ्यासमोर ठेवून 30 विषय देण्यात आले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या पासून ते ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत लोक भरभरून बोलले होते. दरम्यानच्या काळामध्ये २०१५ मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (Sustainable Development Goals) जाहीर करण्यात आले. ही ध्येये गाठण्यासाठी व्यापक अर्थाने राजकीय आणि सामाजिक वैचारिक भेदाभेद बाजूला ठेवून राजकीय इच्छाशक्ती आणि सांघिक प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी स्वत: पत्रकारांनी आपले नित्याचे कर्तव्य बजावताना थेट समन्वयक म्हणूनही सक्रिय सहभाग घेतला पाहिजेत; जेणेकरून स्थानिक सर्वसमावेशक व शाश्वत विकासामध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्पादकता अधिक परिणामकारकपणे अनुभवयास येवू शकते, या दृष्टीकोनातून डॉ.अनिल फळे यांनी विशेष संकल्पना व कृती आराखडा तयार केला आहे. तो म्हणजेच, ‘अप्रतिम महावक्ता – दि पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज २०३२ – शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने’.
राजकारण ते पर्यावरण अशा विविध प्रकारचे बिट्स सांभाळणारे, फिल्डवर काम करणारे वार्ताहर जे गुणवत्तापूर्ण वृत्त संकलन व विश्लेषण करतात; यांचा सन्मान करण्यासाठी २०१० साली ‘चौथास्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार’ हा उपक्रम सुरू केला. अलीकडे जानेवारी २०२३ मध्ये मराठी पत्रकार – दर्पण दिनाच्या मुहूर्तावर सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते चौथास्तंभ या पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेले आहे. आणि याच कार्यक्रमात जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते ‘अप्रतिम महावक्ता – दि पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज २०३२ – शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने’ या भव्य कार्यक्रम मालिकेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले आहे.