एसडीजी जर्नालिझम ऑनलाइन कोर्स प्रवेश नोंदणी
विकास पत्रकारिता करणाऱ्या सर्व प्रकारच्या माध्यम संस्थांना आणि ग्रामीण – शहरी पत्रकारांना प्रोत्साहित करणे, पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या थेट व्यवसायिक अनुभव देत प्रमाणपत्र ऑनलाइन कोर्स अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षित करणे आणि त्याचबरोबर जबाबदार नागरिकांना सिटीझन जर्नालिस्ट म्हणून सर्वोत्तम संधी देणे हे अप्रतिम मीडियाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी ‘चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरिय पुरस्कार’ आणि ‘अप्रतिम महावक्ता – २०३२ पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज – शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने’ हे दोन उपक्रम विशेषत्वाने राबविले जात आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून श्वास महाराष्ट्राचा ही कार्यक्रम मालिका आहे. केवळ वक्तृत्व स्पर्धा नसून स्थानिक पातळीवर पत्रकार, राजकारणी, शासकीय-निमशासकीय संस्था, एनजिओ इत्यादी घटकांच्या विविध उपक्रमांचे व्यासपीठ आहे.
जागरूक नागरिक – सिटीझन जर्नालीस्ट आणि प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि न्यू मीडिया या तीनही प्रकारातील पत्रकारांना दर्जेदार आशय निर्मिती व व्यवस्थापन; सामाजिक समन्वयाची जबाबदारी आणि व्यावसायिक लाभ देण्यासाठी एसडीजी जर्नालिझम कोर्स चालविला जात आहे. या कोर्सचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या व आपल्या परिसरात एसडीजी जागतिक ध्येयांच्या स्थानिकीकरणात योगदान देवू इच्छिणाऱ्या नागरिक व पत्रकारांनी www.apratimmedia.in या वेबसाईटवर आपली सशुल्क प्रवेश नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.
शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) यांच्या संदर्भात जागरूक नागरिकांना सिटीझन जर्नालिस्ट – डेव्हलपमेंट सोल्जर म्हणून आणि व्यावसायिक पत्रकारांना SDG-केंद्रित आधुनिक विकास पत्रकारिता शिकवण्यासाठी ऑनलाइन कोर्स आयोजित करणे, हा एक प्रभावी उपक्रम आहे. यामुळे स्थानिक पातळीवर SDGs चा प्रसार आणि जागरूकता वाढेल, तसेच पत्रकारिता क्षेत्रात नवीन दृष्टिकोन विकसित होईल.
“अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज – शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने” श्वास महाराष्ट्राचा ही मोहीम म्हणजे हा एक कृती आराखडा आहे. जो महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा, विभाग आणि अर्थातच राज्यात राबविला जाणार आहे. जागतिक ध्येये म्हणजे शास्वत विकास ध्येये यांचे स्थानिकीकरण करणे, यासाठी पत्रकार संस्था व व्यक्तिशः पत्रकारांनी समन्वयकाची भूमिका बजवावी, अशी अपेक्षा आहे.
गाव, तालुका, जिल्हा पातळीवर शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरणात जनजागृती करण्यासाठी पत्रकारांच्या व माध्यम संस्थांच्या मार्फत अनेक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. ‘अप्रतिम मीडिया’ ही बहु आयामी एजन्सी असल्याने सर्व माध्यम संस्थांना व मुक्त पत्रकारांना सहभागी होता येईल. दैनिकांच्या विशेष पुरवण्या, वृत्तवाहिन्यांचे स्पेशल फीचर्स, वेब पोर्टल व युट्युब चॅनेल साठी वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट इत्यादी अनेक साधने एका छत्राखाली आणली जात आहेत. यासाठी पत्रकारिता शिकू इच्छिणारे नागरिक आणि पत्रकारांचे वृत्तांकन – विश्लेषण आणि माध्यम व्यवसायिकांसाठी मोठा व्यवसाय अशी दुहेरी संधी मिळणार आहे.
एसडीजी जर्नालिझम कोर्स प्रवेश नोंदणी