AM Expert Forum
प्राथमिक शाळेच्या शिक्षकापासून ते राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थ, पर्यावरण व सामाजिक तज्ञ, अभ्यासक, संशोधक ही मोठी मानवी संपत्ती महाराष्ट्रामध्ये आहे. ‘अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज २०३२ – शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने‘ या १० वर्षांच्या पत्रकारांच्या कार्यक्रम मालिकेला मार्गदर्शक आणि विविध स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून तसेच आशय निर्मितीसाठी या बुद्धिवंतांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. तो लक्षात घेऊनच ‘ए एम एक्सपर्ट फोरम‘ ची स्थापना करण्यात येत आहे. अप्रतिम मीडियाला स्थानिक पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत चे सदस्य यासाठी अपेक्षित आहेत. बहुआयामी प्रसार-माध्यम संस्था म्हणून अप्रतिम मीडिया विविध कार्यक्रमांच्या आयोजना बरोबरच मुद्रित व दृकश्राव्य निर्मिती करणार आहे. त्यामध्ये या मंडळींना आपापले योगदान देता येईल. शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी सर्व माध्यमांचे पत्रकार जो पुढाकार घेत आहेत; त्यांना बौद्धिक बळ देण्यासाठी जे सहकार्य करू इच्छितात. त्यांनी ‘एएम एक्सपर्ट फोरम’चे सदस्य म्हणून नोंदणी करावी. कृपया पुढीलप्रमाणे आपले रजिस्ट्रेशन करावे.