ए एम २०३२ ड्राईव्ह/ AM 2032 Drive

उपक्रमाचा उद्देश

ए एम २०३२ ड्राईव्ह सोशल ऑडीट ड्राईव्ह या विशेष उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण (Localization of SDGs) तसेच   एकूणच,

अधिक प्रभावीपणे घडून यावे, यासाठी लोकसहभागातून पुढील उपक्रम राबविण्याचा संकल्प आहे :

  • SDG विषयक जनजागृती कार्यक्रम
  • विविध शासकीय योजना, प्रकल्प व विकास उपक्रमांचे अभ्यास व मूल्यांकन
  • नागरिकांच्या सहभागातून सोशल ऑडीट प्रक्रिया
  • विकास विषयक संवाद, संशोधन व नागरिक सहभाग मंच
  • पायाभूत सुविधा, कल्याणकारी योजना, लोकप्रतिनिधींच्या स्वेच्छा निधीतील कामे आणि विविध विकास प्रकल्पांची अंमलबजावणी शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून झाली पाहिजे. अन्यथा विकासाची संकल्पना अपुरी ठरते.
  • महाराष्ट्र शासनही विविध धोरणे व योजनांमध्ये शाश्वत विकास ध्येये (SDGs) लक्षात घेऊन कार्य करत आहे.
  • महाराष्ट्र हे भारतातील अग्रगण्य राज्यांपैकी एक असून नीती आयोगाच्या SDG इंडेक्समध्ये फ्रंट रनर या श्रेणीत सातत्याने स्थान मिळवत आहे. ‘SDG इंडिया इंडेक्स २०२३-२४’ अहवालानुसार भारताचा एकत्रित SDG स्कोर ७१ आहे.

राज्य शासनाने ‘विकसित महाराष्ट्र – २०४७’ हा दीर्घकालीन विकास आराखडा तयार केला आहे.

पायलट प्रकल्प

या उपक्रमाच्या पायलट प्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पातून नागरिक सहभागावर आधारित विकास मूल्यमापनाचे एक मॉडेल विकसित करण्याचा उद्देश आहे. 

पुरस्कार उपक्रम

शाश्वत विकासासाठी योगदान देणाऱ्या विविध घटकांचा गौरव करण्यासाठी “अप्रतिम एसडीजी पुरस्कार – २०२६” प्रस्तावित आहेत :

• चौथा स्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार
• SDG मास्टर ट्रेनर जिल्हास्तरीय पुरस्कार
• शासकीय विभाग / स्वयंसेवी संस्था पुरस्कार
• कॉर्पोरेट CSR सामाजिक बांधिलकी पुरस्कार

Objective of the Initiative

Through the special initiative “AM 2032 Drive – Social Audit Drive”, there is a commitment to promote the localization of Sustainable Development Goals (SDGs) in Maharashtra and to ensure that overall development becomes more effective through active public participation. For this purpose, the following initiatives are proposed:

  • Awareness programs on Sustainable Development Goals (SDGs)
  • Study and evaluation of various government schemes, projects, and development initiatives
  • Social audit processes with active citizen participation
  • Platforms for dialogue, research, and citizen engagement on development issues
  • Implementation of infrastructure projects, welfare schemes, works funded through discretionary funds of public representatives, and various development projects should be aligned with the perspective of sustainable development; otherwise, the concept of development remains incomplete.
  • The Government of Maharashtra is also implementing various policies and schemes keeping the Sustainable Development Goals (SDGs) in focus.
  • Maharashtra is one of the leading states in India and consistently ranks in the ‘Front Runner’ category in the NITI Aayog SDG Index. According to the ‘SDG India Index 2023–24’ report, India’s composite SDG score stands at 71.
  • The State Government has prepared a long-term development vision titled ‘Viksit Maharashtra – 2047’.

Pilot Project

For the pilot phase of this initiative, Chhatrapati Sambhajinagar city and district have been selected. The objective of this pilot project is to develop a model for development evaluation based on citizen participation.

Apratim SDG Awards Initiative

To recognize and honor the contributions of various stakeholders working towards Sustainable Development, the following awards are proposed under “Apratim SDG Awards – 2026”:
• Chautha Stambh State-Level Journalism Award
• SDG Master Trainer District-Level Award
• Government Department / Non-Governmental Organization Award
• Corporate CSR Social Responsibility Award